Join us  

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:53 PM

डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत.

ठळक मुद्देचित्रपटामधील संवाद, गाणी याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे

मराठी थेटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी... कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात यांनी अढळ स्थान मिळवले. ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते असे. 

डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते... ज्यांच्या प्रवेशाने टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे तसेच त्यांच्यासोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर), हा सिनेमा लवकरच सर्वत्र रिलीझ होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

चित्रपटामधील संवाद, गाणी याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे....चित्रपटाच्या टीझरला, ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य लवकरच मोठया पडद्यावर उलगडणार आहे.

टॅग्स :काशिनाथ घाणेकरसुबोध भावे सोनाली कुलकर्णी