Join us  

अमृता खानविलकर इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासुबाई, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 7:00 AM

अमृता खानविलकर (Amrita Khanvilkar ) आणि हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra)कडे इंडस्ट्रीतमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.

अमृता खानविलकर (Amrita Khanvilkar ) आणि हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra)कडे इंडस्ट्रीतमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. अमृता आणि हिमांशू सोशल मीडियावर नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन प्रेम व्यक्त करत असतात. अमृता काम निमित्त मुंबईत राहते तर हिमांशू दिल्ली. तुम्हाला माहिती आहे का हिमांशूची आई म्हणजेच अमृताच्या सासूबाईदेखील दिसायला खूपच सुंदर आहेत. अमृताचा पती हिमांशूने काही महिन्यांपूर्वी दोघींचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात  या दोघींमधले बॉडिंग स्पष्ट दिसले होते. 

 

इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवरच अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते. हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठी. दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं होते. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी जवळजवळ 9 वर्षे अमृता व हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते.

अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :अमृता खानविलकर