Join us  

Amruta Khanvilkar Birthday Special : अमृता खानविलकरने अशाप्रकारे साजरा केला तिचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 9:00 PM

अमृताच्या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.

ठळक मुद्देसांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला. या पार्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमाला मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले होतेचाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँड ग्रीटसाठी खास वेळ काढला.

    वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिचा आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला वाढदिवस असून तिचा जन्म पुण्यातला आहे. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. 'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली, 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

यंदाचे वर्ष अमृतासाठी खूपच खास आहे. 'राझी', 'सत्यमेव जयते' या हिंदी सुपरहिट चित्रपटांमुळे आणि 'डेमेज्ड' या वेबसीरिजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला. या पार्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमाला मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले होते. चाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँड ग्रीटसाठी खास वेळ काढला.

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर घेण्यात आलेल्या अमृताच्या चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित #अल्टिमेटफॅनऑफअमृता या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना या पार्टीत बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे या विजेत्यांची निवड खास अमृतानेच केली होती. 'मी जे काही आहे, ते केवळ माझ्या चाहत्यांमुळेच आहे. त्यांच्या अमाप प्रेमामुळे मी इथपर्यत पोहोचले आहे, या शब्दांत तिने चाहत्यांचे आभार मानले. तसेच यापुढेदेखील अशीच साथ द्या, अशी विनंतीदेखील तिने या सर्वांना केली.  

टॅग्स :अमृता खानविलकर