Join us

‘राजवाडे अ‍ॅँड सन्स’ मधून अमित्रियानच चित्रनगरीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 07:41 IST

सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘राजवाडे अ‍ॅँड सन्स’ चित्रपटात एका उच्चभ्रू तरूणाच्या भूमिकेतून चित्रनगरीत पदार्पण करीत आहे. जुन्या पिढीचा जुना आग्रह ...

सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘राजवाडे अ‍ॅँड सन्स’ चित्रपटात एका उच्चभ्रू तरूणाच्या भूमिकेतून चित्रनगरीत पदार्पण करीत आहे. जुन्या पिढीचा जुना आग्रह आणि नवीन पिढीची महत्त्वाकांक्षा.. या दोन्हीतला फरक या  चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटासाठी जेव्हा अमित्रियानला विचारण्यात आले तेव्हा मराठी त्याची मातृभाषा असल्याने त्याने ताबडतोब चित्रपटासाठी होकार दिला. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्याला गमवायची नव्हती.