Join us  

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले रंगभूषाकाराचे हात, करतोय रुग्णांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 6:15 PM

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक सिने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी रविंद्र समेळ यांनी त्या कामगारांना अन्न धान्य पुरवले तसेच अनेकांना आर्थिक मदतीचा हात सुद्धा दिला आहे.

सध्याची परिस्थिती ही फार चिंताजनक आहे. या अशा नकारात्मक परिस्थितीत सुद्धा काही मंडळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मदतीसाठी पुढे येत आहे. कलाकारांप्रमाणेच पडद्यामागे राहून काम करणारे कलाकारही या मदत कार्यात पुढे आले आहेत. मनोरंजन सृष्टीत रंगभूषाकार म्हणून कार्यरत असलेले रविंद्र समेळ हे आज अनेकांना बेड पासून ते ऑक्सिजन पर्यंत मदत पुरवण्याचे काम करत आहे.आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाट्य रंगभूषाकार म्हणून रविंद्र समेळ यांनी केली. त्या नंतर अनेक नाटकासाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं. नाटकानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला. मेकअप डिझायनर म्हणून मनोरंजन विश्वात रविंद्र समेळ सध्या कार्यरत आहेत. सगळं करत असताना सामाजिक कर्तव्य त्यांनी नेहमीच लक्षात ठेवली आहेत. 

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक सिने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी रविंद्र समेळ यांनी त्या कामगारांना अन्न धान्य पुरवले तसेच अनेकांना आर्थिक मदतीचा हात सुद्धा दिला आहे. सध्या करोनाचा वाढता प्रभाव यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीत अनेकांना मनोबलाची गरज असते ते वाढवण्यासाठी रविंद्र समेळ हे मदत करत आहे. 

योग्यवेळी योग्य ती माहिती न मिळाल्याने अनेकदा सामन्याचा गोंधळ होतो. अशात सध्याचा काळात चित्रपट आणि मालिकासाठी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक संकटातून जावं लागतं आहे. अशा वेळी रविंद्र समेळ हे आपल्याकडील माहिती आणि संसाधनाच्या मदतीने त्यांची मदत करत आहेत. सिने कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला ही करोना झाला तर त्याला योग्य वेळेत बेड मिळवून देणे आणि त्याची योग्य ती सोय करणे या कडे रविंद्र समेळ स्वतः जातीने लक्ष देत आहे. 

आपल्या सभोवताली फार नकारात्मक वातावरण निर्माण झालाय, आपणच आपली काळजी घेणारी नाही तर कोण घेणार, आपण स्वतःहून पुढे येऊन आपल्या आवाक्यात आहे तेवढं आपण करू शकतो. आपल्या जवळच्या लोकांचं दुःख आपण जाणतो अशा वेळी मदतीचा एक हात पुढे करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी केलेली मदत हे समाजाने आपल्याला जे दिलंय त्याची एका अर्थाने परतफेड आहे .

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस