Join us

​ अमेय वाघ आता होणार ससा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 14:27 IST

रंगभूमीवर सध्या अनेक विविध विषयांवरील नाटक पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटांप्रमाणेच आता नाटकही सातासमुद्रापार पोहोचली आहेत. आपल्या नाटकांचे विषय ...

रंगभूमीवर सध्या अनेक विविध विषयांवरील नाटक पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटांप्रमाणेच आता नाटकही सातासमुद्रापार पोहोचली आहेत. आपल्या नाटकांचे विषय आणि कथा दमदार असल्याने प्रेक्षक नाटकांनाही चांगलीच पसंती दशर्वित आहेत. पण नाटक म्हटले कि डोळ्यासमोर लगेच रंगमंच आणि तालमी करणारे कलाकार दिसु लागतात. कोणत्याही नाटकाला योग्य दिशा दयायची असेल तर दिग्दर्शक हा लागतोच. आणि नाटक प्रेक्षकांसमोर निर्विघ्न पार पाडायचे असेल तर त्यासाठी तालमी या करायव्याच लागतात. परंतु रंगभूमीवर सध्या एक असे नाटक चांगलेच गाजत आहे ज्याला दिग्दर्शकही नाही आणि त्याच्या तालमी देखील होत नाहीत. वाटले ना आश्चर्य पण नसिम सोलीमॅनपुर लिखित व्हाईट रॅबीट, रेड रॅबीट हे असेच एक अनोखे नाटक सध्या रंगमंच गाजवत आहे. आता या नाटकात आपल्याला लवकरच अभिनेता अमेय वाघ दिसणार आहे. अमेयने सोशलसाईट्सवर याबाबत खुलासा केला आहे. अतिशय गमतीशीरपणे अमेय म्हणतोय, मी वाघ असलो तरीही आता ससा होणार आहे. येताय का बघायला? असा प्रश्न देखील अमेयने प्रेक्षकांना विचारला. कलाकार स्वत:च्याच नावाची खुलेआम फजिती करताना दिसतात. पण अमेयला देखील मानायला हवे. असे जगजाहीरपणे आपल्यावर विनोद करायला पण तेवढे गट्स लागतात. पण ते काहीही असले तरी अमेय आता एका वेगळ््या प्रयोगासाठी सज्ज झाला आहे. आता तो या नाटकात कसा ससा बनतोय हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद सिध्देश पुरकर यांनी केला आहे. लवकरच अमेयला या अनोख्या नाटकात पाहण्याची संधी नाट्यरसिकांना मिळणार आहे.