Join us

अमर फोटो स्टुडिओ झाला चेकमेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 15:57 IST

हजार आणि पाचशेच्या नोटांमुळे चित्रपटसृष्ट्रीवर परिणाम झाला असल्याचे चर्चेत होते. तसेच नोटाबंदीमुळे नाटकांवर आणि चित्रपटांवर परिणाम होत असल्याचेदेखील पाहायला ...

हजार आणि पाचशेच्या नोटांमुळे चित्रपटसृष्ट्रीवर परिणाम झाला असल्याचे चर्चेत होते. तसेच नोटाबंदीमुळे नाटकांवर आणि चित्रपटांवर परिणाम होत असल्याचेदेखील पाहायला मिळाले. कारण कित्येक नाटक आणि चित्रपट या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र या सर्व गोष्टीवर पर्याय म्हणून अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या टीमने चेकस, आॅनलाईन बुकिंग, डेबिट कार्ड, तिकिटस, बुक माय शो अशा अनेक मार्गानी तिकीट विक्री करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या गोष्टीला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतेच अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता सुनिल बर्वे, सखी गोखले आणि अमेय वाघ या कलाकारांनी हातात खूप सारे चेक घेतल्याचा पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी अनेक लाइक्स दिले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या पयार्याचे मनापासून कौतुकदेखील केले आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची निर्मिती अभिनेते सुनिल बर्वे यांनी केले आहे. तर या नाटकात अमेय वाघ,सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या नाटकाची चर्चादेखील हीट असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकाचे प्रयोग आपल्याही गावात व्हावे अशी इच्छादेखील त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली असल्याचे दिसत आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून या टीमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच या मालिके नंतर आता ही टीम पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळत असल्यामुळे चाहतेदेखील आनंदात असल्याचे दिसत आहे.