Join us  

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावुक पोस्ट, म्हणाले, “ती होती...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 8:00 PM

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने आजारी होत्या. मुलगा अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी विवाह केला होता. अभिनय देव व अजिंक्य देव ही त्यांची दोन्ही मुले मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य देव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी “ती होती आणि ती आता नाही” असं कॅप्शन दिलं आहे. अजिंक्य यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ भावुक करणारा आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्य देव यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर आता दीड वर्षांनी सीमा देव यादेखील स्वर्गवासी झाल्या.

६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट, तुम्हाला माहितीये का किस्सा?

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. मराठीबरोबरच सीमा देव यांनी हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

बॉलिवूड अभिनेत्रीने खरेदी केलं सुशांत सिंह राजपूत राहत असलेलं घर, अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर रिकामी होता फ्लॅट

सीमा देव आणि रमेश देव यांनी २०१३ साली मोठ्या उत्साहात लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता.  मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांनी मुलाखतीदरम्यान त्यांच्या लव्हस्टोरीचे किस्सेही सांगितले होते.

टॅग्स :अजिंक्य देवरमेश देवमराठी अभिनेतामराठी चित्रपट