अजय गोगावले म्हणतोय, लागीर झालं रं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:33 IST
अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील अव्वल संगीतकार जोडी अहे. मराठीच नाही तर यांनी बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या संगीताची जादु बिखेरली आहे. ...
अजय गोगावले म्हणतोय, लागीर झालं रं...
अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील अव्वल संगीतकार जोडी अहे. मराठीच नाही तर यांनी बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या संगीताची जादु बिखेरली आहे. सैराट या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. अजयचा आवाज तर काळजाचा घाव घेतल्याशिवाय राहतच नाही. त्याच्या आवाजातील दर्द मनाला स्पर्ष करुन जातो. आता अजय पुन्हा एकदा रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे. रांजण नावाच्या एका आगामी मराठी चित्रपटामध्ये अजयने लागीर झाला हे गावरान बाज असलेले गाणे एकदम रांगडया आवाजात गायले आहे. रांजण या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या गाण्याची छोटीशी झलक देखील आऊट झाली आहे. महागणपती एंटरटेन्मेंट चा रांजण हा चित्रपट प्रकाश पवार यांनी दिग्दर्शीत केला आहे. या चित्रपटाचे लेखक देखील प्रकाश पवारच आहेत. तर या चित्रपटाला नरेंद्र भिडे यांनी संगीत देले आहे. लागीर गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहीले आहेत. तर अजयने हे गाणे त्याच्या शैलीत एकदम हटके अंदाजात गायले आहे. या गाण्याला अनेक हिट्स मिळत आहेत. यश आणि गौरी हे दोन नवोदित कलाकार या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये हे दोन टिनएजर कलाकार दिसत असल्याने नक्कीच हा चित्रपट किशोरवयीन प्रेमकथेवर आधारलेला असणार याचा अंदाज येतो. आता या चित्रपटाची खरंच कथा काय आहे हे तर आपल्याला लवकरच समजेल. तो पर्यंत अजयचे हे भन्नाटे गाणे सर्वजण एंजॉय करुयात.https://www.youtube.com/watch? v=JLGfPfRtUic