Join us

अजय ने शोधिला स्वमनीचा विठ्ठल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 14:27 IST

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' चित्रपटाद्वारे अजय गोगावले पुन्हा एकदा पंढरपूरच्या विठाई ला साद ...

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' चित्रपटाद्वारे अजय गोगावले पुन्हा एकदा पंढरपूरच्या विठाई ला साद घालण्यासाठी व समस्त श्रोत्यांना आपल्या तालावर नाचविण्यासाठी “देव पहिला” म्हणत सज्ज झालेला आहे.आजवर 'खेळ मांडला' असो किंवा 'डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजे ला' असो कोणत्याही प्रकारचं गाणं असू देत त्याच्या प्रत्येक गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य करणारा सैराटमय अजय रिंगणात अडचणीत सापडलेल्या एका बाप लेकाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला आपल्या सुरेल गाण्याने साद घालतं आव्हान करीत आहे. पांडुरंग आणि पंढरपूर म्हंटलं की अजयचं माऊली माऊली रूप तुझे हे गाणं डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. या गाण्याने फक्त पंढरपूरच नव्हे तर अखंड महाराष्ट्र भारावून गेला होता.विधि कासलीवाल प्रस्तुत रिंगण या चित्रपटाची गाणी रोहीत नागभीडे यांनी संगीतबद्ध केलेली असून वैभव देशमुख याने ती लिहिलेली आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांचे असून छायाचित्र दिग्दर्शन अभिजित अब्दे यांनी केले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' हा चित्रपट येत्या ३० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगण आपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले आहे. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं.