Join us

सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर

By तेजल गावडे | Updated: December 3, 2020 11:30 IST

अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.अभिज्ञा भावेचे सध्या केळवण सुरू असून तिने याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिज्ञा भावेच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काही समजू शकले आहे.

अभिज्ञा भावेचे नुकतेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या घरी केळवण पार पडले. त्यावेळचे काही फोटो अभिज्ञाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

तसेच अभिनेत्री मिताली मयेकर हिने अभिज्ञाचा फोटो इंस्टास्टोरीवर शेअर करत केळवण असे कॅप्शन दिले आहे. 

अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला आहे. अभिज्ञाने 'माझा साखरकारखाना' असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला होता. 

अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. २०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.

२०१० साली 'प्यार की ये एक कहाणी' या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नुकताच त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित झाला होता. सध्या ती रंग माझा वेगळा मालिकेत पहायला मिळते आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावेसिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर