Join us  

कौतुकास्पद! कलादिग्दर्शक सुमीत पाटील देतोय दृष्टीहीनांना जगण्याची नवी दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 5:11 PM

सुमित पाटील यांनी रंगगंध या उपक्रमामार्फत दृष्टीहीन व्यक्तींना एक वेगळी दृष्टी दिली आहे.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कलेचा आनंद अनुभवण्यात मदत करण्यासाठी कला दिग्दर्शक सुमीत पाटील यांना त्यांचा पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकास आणि केंद्रीकरणासाठी श्रीरंग ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्रीरंग वंचित, ऍसिड हल्ल्यातील बळी, मानवनिर्मित आपत्ती, शारीरिकदृष्ट्या अपंग इत्यादींना उत्तेजित करण्याचे विविध उपक्रम पार पाडतात.

सुमित पाटील यांनी "रंगगंध" या उपक्रमामार्फत दृष्टीहीन व्यक्तींना एक वेगळी दृष्टी दिली आहे. रंगात गंध मिसळून त्यावरून तो ओळखायचा जसं की गुलाब म्हणजे लाल रंग ,चाफा म्हणजे पिवळा रंग अश्या रंगाची निर्मिती यांनी केली आहे. या रंगांतून अनेक नेत्रहीन मुलं मुली चित्रकला, हस्तकला शिकत आहेत.

रंगगंध ही एक चळवळ आहे त्या चळवळीतून महाराष्ट्रभर प्रदर्शनं, नवनवे उपक्रम करून, चित्रकलेतून हस्तकलेतून नेत्रदानाबद्दल जागरूकता घडवून आणत आहेत.

 आतापर्यंत त्यांनी १५०० हुन जास्त विद्यार्थी घडवले आहेत. अश्या प्रकारे सुमित पाटील दुर्लक्षित मतिमंद, गतिमंद, अंध समाजाला धावत्या जगात आणून आत्मनिर्भर बनवत आहेत.

या  व्हिडीओच्या  माध्यमातून सुमित पाटीलने सांगितले की, 'सध्या कोरोनाचा काळ आहे. बघावे तिकडे जवळपास निराशेचे चित्र, वातावरण दिसून येते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना उत्साह, सकारात्मकता नक्कीच मिळेल. मला संपूर्ण भारतातील दृष्टीहीन आणि नेत्रहीन विद्यार्थ्यांसोबत रंगगंधच्या माध्यमातुन चित्र साकारायची आहेत. NEWJ च्या माध्यमातुन रंगगंध चळवळ विविध भाषेतून तुमच्यापर्यंत पोहचत आहे मी NEWJ चा आभारी आहे'.