Join us  

लॉकडाऊन दरम्यान आदिनाथ कोठारेलाही करावा लागला होता 'या' कठिण प्रसंगाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 10:14 AM

आजोबा आदिनाथला लाडाने 'बोबी' म्हणतात.आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे आम्ही सगळे नकळतपणे आजोबांकडून घेत असतो.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला अशात घरात बंदिस्त असताना प्रत्येकजण आपल्या कुटुंबासह इतरांचीही काळजी घेत होता. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपपल्यापरीने प्रयत्न  केलेत. अशात काहींसाठी लॉकडाऊन दरम्यानचा काळ हा संघर्षाचा ठरला. लॉकडाऊन दरम्यानच्या काळाने प्रत्येकाला काहीना काही शिकवलंय. लॉकडाऊन जणू आपल्या कुटुंबाच्या जवळ जाण्याचीही मिळालेली संधीच होती. अभिनेता आदिनाथ कोठारेनेही लॉकडाऊन दरम्यानचा काळाविषयी एक प्रसंग चाहत्यांस शेअर केला आहे.

महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्रात त्याने या विषयी एक लेख लिहीला असून त्यातून लॉकडाऊन दरम्यान काळातील कठिण प्रसंग त्याने सांगितला आहे. आदिनाथचे त्याच्या आजोबांसह असलेल्या नात्याविषयी हा लेख होता. नेहमीच आदिनाथचे कुटुंबाविषयी प्रेम सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते. कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.  त्याने शेअर केलेल्या फोटोत कुटुंबासह असलेले प्रेमळ नातं पाहायला मिळतं.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे. त्यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा आदिनाथने देखील अभिनयसृष्टीत नाव कमावले आहे. 

 

महेश कोठारे यांचे वडिल आदिनाथ कोठारेचे आजोबा ९४ वर्षांचे आहेत. लॉकडाऊन दरम्यान त्यांची तब्येत फारच खालावली होती. त्यामुळे तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते. रूग्णालयात आजोबांची आदिनाथने त्यांची काळजी घेतली. आजोबा रूग्णालयता असल्याचे पाहून कुटुंबियही चिंतेत होते. मात्र आजोबासह असलेल्या गोड आठवणींनी आदिनाथला पुन्हा त्याचे बालपणातले दिवस आठवले.

लहानपणापासून ते आत्तापर्यंत आजोबांनी दिलेल्या प्रेमाविषयी आदिनाथने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजोबा आदिनाथला लाडाने 'बोबी' म्हणतात.आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे आम्ही सगळे नकळतपणे आजोबांकडून घेत असतो. आज जे काही यश मिळाले आहे त्याचे संपूर्ण श्रेय वडिलांप्रमाणे आजोबा आणि कुटुंबियाना जाते असे आदिनाथने म्हटले आहे.

टॅग्स :आदिनाथ कोठारेमहेश कोठारे