आदिनाथ कोठारेने या कारणामुळे बदलला त्याचा लूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 11:33 IST
आदिनाथ कोठारेने सतरंगी रे, झपाटलेला २ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी 100 डेज मालिकेत झळकला होता. ...
आदिनाथ कोठारेने या कारणामुळे बदलला त्याचा लूक?
आदिनाथ कोठारेने सतरंगी रे, झपाटलेला २ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो काही दिवसांपूर्वी 100 डेज मालिकेत झळकला होता. आता सध्या त्याच्या पाणी या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यग्र आहे. पण व्यग्र शेड्युलमधून देखील वेळ काढून तो त्याची मुलगी जिजासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जिजासोबतचा एक क्यूट फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे. या फोटोला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी हा फोटो लाइक केला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोत जिजा आदिनाथच्या मांडीवर असल्याने आपल्याला त्याचा संपूर्ण चेहरा दिसत नाहीये. पण त्या फोटोत आदिनाथमधील एक बदल आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे.आदिनाथ या फोटोत मिशीत दिसत असून त्याच्या या लूकची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाणी या आगामी चित्रपटासाठी आदिनाथने हा नवा लूक केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पाणी या चित्रपटात आदिनाथ मुख्य भूमिका साकारत असून या भूमिकेवर तो चांगलीच मेहनत घेत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील आदिनाथच करणार आहे. प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ मार्फत ‘पाणी’ या मराठी चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. महाराष्ट्र सध्या पाणी प्रश्नाला सामोरे जात आहे. त्यामुळे हाच धागा या चित्रपटात पकडण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात नगदरवाडी येथील दुष्काळग्रस्त खेड्यात राहणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा प्रेक्षकांना पाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या जनतेची पाण्यासाठी होणारी दैनंदिन व्यथा, त्यांचं घराबद्दलचं प्रेम, रोजच्या जगण्यातला संघर्ष या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, रूचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीष जोशी आणि रजित कपूर हे कलाकार दिसणार आहेत. Also Read : उर्मिला कोठारे आणि तिची मुलगी जिजाचा हा सेल्फी होतोय सोशल मीडियावर व्हायरल