Join us  

'सांग तू आहेस ना' फेम पूजा कातुर्डेनं अनोख्या पद्धतीनं साजरा केला व्हॅलेंटाईन डे, चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 6:32 PM

अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत पूजाने काम केलंय..

व्हॅलेंटाईन डे ला खास व्यक्ती सोबत वेळ घालवतो, त्याला स्पेशल गिफ्ट देतो .. पण अभिनेत्री पूजा कातुर्डेन यावेळी व्हॅलेंटाईन डेचं स्वतःलाच गिफ्ट दिलं. पूजानं डॉग कॅफेमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. पूजा म्हणते, ''खरंतर व्हॅलेंटाईन डे ला रोमाँटिक डेटवर जायचं स्वप्न सगळ्यांचं असतं... पण माझ्यासाठी माझे व्हॅलेंटाईन हे छोटे प्राणी बनले. मला लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे... माझ्या घरीही दोन मांजरी आहेत.. त्यांच्यासोबत माझा प्रत्येक दिवसच व्हॅलेंटाईन असतो... पण या खास दिवसातही मी dog cafe madhe गेले होते आणि तिकडे मला खूपच मजा आली.. हे प्राणी आपल्यावर किती निरपेक्ष प्रेम करतात.. यांच्यासोबत माझा खास बॉण्ड पण तयार झाला.  मला प्राण्यांसाठी जितकं काही करता येईल, तितकं करायचंय.''असं पूजाने यावेळी सांगितलं. तिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

एकांकिकेतून सुरुवात करुन पूजा कातुर्डे मालिका आणि सिनेमातून झळकली आहे. अनेक मराठी मालिकांतून विविध भूमिकेतून दिसून आलीय. अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत काम केलंय.. सांग तू आहेस ना या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिका चांगली गाजली होती. लग्न मुबारक या सिनेमातही पूजानं काम केलं होतं.

टॅग्स :सेलिब्रिटीव्हॅलेंटाईन्स डे