Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्ण पेठेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 20:00 IST

काही दिवसांपूर्वी पर्ण पेठे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाशी जोडली गेली आहे. उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला गेल्याने या नाटकात तिची जागा पर्ण पेठे हिने घेतली आहे.

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री पर्ण पेठे हिलाही आहे. पर्ण ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पेंटिंग पोस्ट केले होतं. या चित्राला तिने ‘आमचं घर’ असं कॅप्शन दिले होते. तिनं काढलेले हे चित्र पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. 

काही दिवसांपूर्वी पर्ण पेठे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाशी जोडली गेली आहे. उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला गेल्याने या नाटकात तिची जागा पर्ण पेठे हिने घेतली आहे. या नाटकाचा भाग बनत असल्याचा आनंद पर्ण पेठेनं सोशल मीडियावर व्यक्त केला होता. “माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र अमर फोटो स्टुडिओ चालवतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. यापुढे मी सुद्धा या नाटकाचा अविभाज्य घटक बनत आहे. त्यासाठी उत्साही तर आहेच शिवाय नव्या आव्हानांसाठी सज्ज आहे” असं पर्ण पेठेने सोशल मीडियावर म्हटलं होतं. याशिवाय पर्ण पेठेने मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहेत. विहीर, रमा माधव, वायझेड, फोटोकॉपी अशा विविध सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.  

टॅग्स :पर्ण पेठे