Join us  

"सगळ्यांसारखे तुम्ही पण म्हणाल.." मृणाल कुलकर्णी लाडक्या लेकासाठी आणि सूनेसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 3:36 PM

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. दोघांसाठी मृणाल कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. आज तिथीनुसार त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. शिवानी ही मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांची खूप लाडकी आहे. अनेकदा ते समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्याचप्रमाणे शिवानीच्या कामाचीही मृणाल प्रशंसा करताना दिसतात. आता त्यांनी लेकासाठी आणि सूनेसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या लेकाच्या आणि सुनेच्या तिथीनुसार लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विराजस आणि शिवानीचा एक सुंदर फोटो शेअर करून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, " प्रिय शिवानी आणि विराजस, आज अक्षय तृतीया, तिथीनुसार तुमच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस!!! एक वर्ष झालं सुद्धा!! अशीच वर्ष पटापट निघून जातील आणि मग आम्हा सगळ्यांसारखे तुम्ही पण म्हणाल, बापरे इतकी वर्षे झाली? कमालच आहे!! खूप स्वप्न बघा आणि ती पुरी करण्यासाठी भरपूर कष्ट करा! आनंदी राहा! खूप खूप प्रेम!!"

पण पडद्यावर अशा भूमिका साकारणाऱ्या या सासु सुना खऱ्या आयुष्यात कशा असतील याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. शिवानी रागोळेने लोकमतल्या दिलेल्या मुलाखतीत सासू-सुनेच्या नात्याचा उलगडा केला होता.

त्यावेळी शिवानी म्हणाली होती, याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पण आमचं नातं मैत्रिणींचं जास्त आहे. अद्याप तरी सासूबाई-सूनबाई असं काहीही आम्ही केलेलं नाहीये. आम्ही आधी एकत्र काम केल्यामुळे आम्ही एकमेकींना ओळखायचो. ज्या गोष्टी आधी विराजस व मृणाल ताई एन्जॉय करायच्या म्हणजे, एकत्र पुस्तक वाचणं, फिल्म बघणं, फिरायला जाणं त्या सगळ्यामध्ये आता मी पण जॉईन झालेली आहे. त्यामुळे आमची अशी मैत्री जास्त आहे. शिवानी आणि मृणाल कुलकर्णी अनेकवेळा सोशल मीडियावर एकमेंकीसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णी