Join us  

'राजकारणाशी संबंध नाही' म्हणत अभिनेत्री मनवा नाईकनं मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 1:06 PM

मनवा नाईक सोशल मीडियावर सक्रीय असते.

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक. तिने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटात काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही तिला ओळखले जाते. याशिवाय मनवा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. समाजातील विविध विषयावार ती मत मांडताना दिसतात. नुकतेच तिने प्रगतीच्या नावाखाली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचा कसा ह्रास होत चालला आहे, यावर परखड मत मांडलं.

मनवाने इन्स्टाग्रामवर एका कन्स्ट्रक्शन साईटचा फोटो शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'हे पूर्णपणे निराशाजनक आहे. पण, वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम साइट्स, ट्रॅफिक आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई हे आता सर्वात वाईट शहर बनलं आहे. धुळीचे थर, इमारतींचे रचले जाणारे हे कुरूप ब्लॉक्स, तर नवीन पायाभूत सुविधांच्या नावाखाली वर्षानुवर्षापासून खोदकाम केले जात आहे. गौरवशाली बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. रेस कोर्सही यात आहे. हे सगळं पाहून मन दुखावलं जात आहे'. या सोबतच तिने या पोस्टचा राजकारणाशी संबंध नाही, असेही म्हटलं.

मनवाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहलं, हे दु:खद वास्तव आहे. विकासाच्या नावाखाली आपण केवळ इमारती उभारणे जाणतो. पण, हेच आपल्यला अस्वास्थ जीवनाकडे नेत आहे'. तर आणखी एका युजरने लिहलं, 'मुंबईच नव्हे तर कोकणात सुद्धा ही परिस्थिती आहे. चिपळूण, रत्नागिरी मध्ये प्रचंड प्रदूषण आणि धूळ आहे. ज्या मुंबई गोवा हायवे च्या नावाखाली निसर्गाचं वाटोळं झालं तो तर काही इतक्या वर्षात झाला नाहीच पण कोकणची वाट लागली'.

मनवाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती एक उत्तम निर्माती असून तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अनेक मालिका गाजताना दिसत आहेत. मनवाचा नवरादेखील प्रसिद्ध निर्माता आहे. मनवाच्या नवऱ्याचं नाव सुशांत तुंगारे आहे. या दोघांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. सुशांत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध निर्माता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमुंबईप्रदूषणमराठी चित्रपट