Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अनन्या' सिनेमाद्वारे या अभिनेत्रीचे मराठी सिनेमात पदार्पण, अशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 06:00 IST

'Ananya' Movie : अनन्या नाटकात ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती. नाटकातील तिच्या भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली होती.

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" हा सिनेमा नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनमाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे.  मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.

 

त्यामुळे या सिनेमाकची अधिक उत्सुकता रसिकांमध्ये असणरा हे मात्र नक्की. सिनेमाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या सिनेमातून मांडलं जाणार असल्यानं हा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.  

अनन्या नाटकात ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती. नाटकातील तिच्या भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली होती. मात्र सिनेमासाठी अनन्याचं पात्र कोण साकारणार याबद्दल विशेष उत्सुकता होती.  तर त्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले होते. छोटा पडदा गाजवल्यानंतर  'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या  सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

चाहत्याने दिलेली भेट पाहून हृता झाली थक्क !

कलाकारांची ओळख, मालिकेतील पात्राच्या नावाने होऊन जाणे अशा घटना सुद्धा घडत असतात. पण, चाहत्यांनी कलाकारावरील आपलं प्रेम, आपुलकी याप्रकारे दाखवणे ही त्यांच्यासाठी कामाची मोठी पोचपावती ठरतात.

हृता याचाच अनुभव सध्या घेत आहे. अशा अनुभवांविषयी व चाहत्यांविषयी बोलताना हृता दुर्गुळे म्हणते; "फुलपाखरू मालिकेमुळे माझी ओळख 'वैदेही' अशीच होऊन गेली आहे. चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव आम्हा कलाकारांवर नेहमीच होत असतो. रोजच एखादा छानसा अनुभव मिळत असतो. पण, हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे. या चाहत्याची मी फार फार आभारी आहे. माझ्यासाठी ही भेट खूपच महत्त्वाची ठरली आहे. वैदेहीचा सोशल मीडियावर असलेला चाहतावर्ग नेहमीच शुभेच्छा देत असतो; मात्र अशा एखाद्या मन जिंकणाऱ्या भेटवस्तूमुळे मिळणाऱ्या शुभेच्छा नक्कीच जास्त आपुलकीच्या वाटतात. चाहत्यांचे असलेले प्रेम असेच कायम राहू देत हीच अपेक्षा आहे."

टॅग्स :ऋता दूर्गुळे