अभिनेत्री अदिती सारंगधर आणि तिच्या लेकाचा हा फोटो तुम्हालाही लाईक करावासा वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:51 IST
मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर हे नाव रसिकांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही ...
अभिनेत्री अदिती सारंगधर आणि तिच्या लेकाचा हा फोटो तुम्हालाही लाईक करावासा वाटेल!
मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर हे नाव रसिकांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. नुकतंच अदितीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये अदिती आणि तिचा चिमुकला लेक पाहायला मिळत आहे. अदितीच्या या चिमुकल्याचं नाव अरीन असं आहे. सोशल मीडियावर या फोटोच्या निमित्ताने या मायलेकाचं दर्शन रसिकांना घडलं आहे. कोणत्याही आईप्रमाणे अदितीचंही आपल्या बाळावर बरंच प्रेम आहे. तिचं हे प्रेम या फोटोतही पाहायला मिळत आहे. गोंडस अरीनचा हा लूक कुणालाही हवाहवासा वाटेल असाच आहे. या आई मुलाच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. रुईया कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून अदितीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. एकांकिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर तिने पाऊल ठेवलं.याशिवाय छोट्या पडद्यावरील 'दामिनी', 'वादळवाट', 'लक्ष्य' अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली. 'नाथा पुरे आता' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली.'प्रपोजल' हे नाटक अदितीच्या कारकिर्दीतील मैलाचं दगड ठरलं.या नाटकातील भूमिकेसाठी विविध पुरस्कारानं अदितीचा गौरवही करण्यात आला. करियर पाठोपाठ आता अदिती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही चांगलीच स्थिरावली.आता तर तिच्या आयुष्यात तिचा लेक अरीनही आहे.आपल्या लेकासह जीवनातील आनंदाचे क्षण ती जगत आहेत.याच खास क्षणाचा खास फोटो तिने आपल्या फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केला आहे.