Join us  

‘मणिकर्मिका’ सिनेमाच्या सेटवर अभिनेता वैभव तत्त्ववादीची ‘क्षणभर विश्रांती’,अभिनेत्री अंकिता लोखंडेसह शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 6:03 AM

बॉलिवूडमध्ये  सध्या मणिकर्णिका या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत प्रमुख भूमिका साकारणार आहे. ...

बॉलिवूडमध्ये  सध्या मणिकर्णिका या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत प्रमुख भूमिका साकारणार आहे. कंगणाची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं सध्या शूटिंग सुरु आहे. या सिनेमाची आणखी एक खास बात म्हणजे यांत मराठमोळे चेहरेही झळकणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादी यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.वैभव तत्त्ववादी या सिनेमात वैभव पूरण सिंह ही भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेसह वैभव स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळेल. याच सिनेमाच्या शूटिंगसाठी वैभव सध्या जोधपूरमध्ये आहे.सिनेमाच्या सेटवरील एक फोटो वैभवने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये वैभव रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे.शूटिंगनंतर रिकाम्या वेळेत वैभव त्याचे सेटवरील फोटो आपल्या फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर करत असतो.वैभव तत्त्ववादी याचा हा काही पहिलाच हिंदी सिनेमा नाही. याआधी त्याने संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही काम केले होते. या सिनेमात वैभवने चिमाजी आप्पा ही भूमिका साकारली होती.मराठीत आपल्या अभिनयाने तरुणींसह रसिकांची मनं जिंकणारा वैभव चिमाजी आप्पाच्या भूमिकेमुळे भलताच भाव खाऊन गेला होता.आता 'मणिकर्णिका' या सिनेमातील वैभव पूरण सिंह या व्यक्तीरेखेलाही चिमाजी आप्पा या भूमिकेप्रमाणे न्याय देण्याचा आणि रसिकांची मने जिंकण्याचा वैभवचा मानस आहे. त्यासाठी तो सेटवर तितकीच मेहनतही घेत आहे.मणिकर्णिका हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या सिनेमाच्या रुपाने रुपेरी पडद्यावर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं शौर्य रसिकांना पाहायला मिळणार आहे. लेखक विजयेंद्र प्रसादने नुकतेच सांगितले की  'ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात भरपूर युद्धचे दृश्य आहेत' याआधी लेखक विजयेंद्रने बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत.