Join us

'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:45 IST

Prakash Bhende : प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वितरक प्रकाश भेंडे यांचे काल २८ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वितरक प्रकाश भेंडे यांचे काल २८ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सुना श्वेता महाडिक-भेंडे आणि किमया भेंडे, नातवंड असा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा आणि सून हे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. प्रकाश भेंडे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकाव्यतिरिक्त उत्तम चित्रकारदेखील होते. त्यांनी आपण यांना पाहिलंत का?, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटक चांदणी, भालू, नाते जडले दोन जीवांचे या सिनेमात अभिनय केला होता. तर आई थोर तुझे उपकार, आपण यांना पाहिलंत का?, चटक चांदणी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि भालू, चटक चांदणी, प्रेमासाठी वाट्टेल ते, आपण यांना पाहिलंत का?, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.