अभिनय बेर्डे म्हणतो, आज बाबांचा सल्ला मिळाला असता तर खूप छान वाटलं असतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 12:26 IST
ती सध्या काय करते या चित्रपटाची रंगू लागली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय ...
अभिनय बेर्डे म्हणतो, आज बाबांचा सल्ला मिळाला असता तर खूप छान वाटलं असतं
ती सध्या काय करते या चित्रपटाची रंगू लागली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे झळकणार आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह त्याला ही या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. एका वेबसाईडच्या मुलाखतीत त्याला विचारले असता, आज या चित्रपटाविषयी बाबांना काय सांगितल असतं, यावर अभिनय म्हणाला, बाबा असते तर आज या चित्रपटासाठी त्यांचा खूपच महत्वाचा सल्ला मला मिळाला असता तर खूूपच छान वाटलं असतं. कारण त्यांच्या मित्रांकडून खूप ऐकत आलो की, बाबा खूप छान सल्ला दयायचे. तसेच मी माझा हा पहिला चित्रपट बाबांना दाखविला असता. अभिनय हा त्याच्या पहिल्या चित्रपटात आर्या आंबेकरसोबत झळकणार आहे. आर्याचादेखील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान झळकणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. सध्या या चित्रपटातील ह्दयात वाजे समथिंग हे गाणे प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्याची सोशलमीडियावरदेखील धूम असल्याची दिसत आहे. तसेच या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. ही गाणी निलेश मोहरीर, अविनाश - विश्वजित आणि मंदार आपटे यांनी संगीतबद्ध केली आहेत. यामध्ये जरा जरा आणि परिकथेच्या पºया ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलंय आहे. तर या गाण्याला हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांचे मन