Join us  

सुनिल बर्वेंना गिफ्ट देण्यासाठी अभिनयने विकली त्याची प्रिय गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 4:43 PM

‘अशी ही आशिकी’ हा सिनेमा फक्त कपल नाही तर संपूर्ण फॅमिली एन्जॉय करु शकते अशी कथा या सिनेमाची आहे.

ठळक मुद्देसॅक्सोफोन विकत घेऊन देण्यासाठी स्वयम त्याची गिटार विकतो

पालक आणि पाल्याचं नातं हे इतर नात्यांपेक्षा फारच वेगळं असतं. या नात्यामध्ये प्रेम, आपुलकी, काळजी, समंजसपणा, जबाबदारीची भावना, कधी-कधी राग-रुसवे आणि मैत्रीचे रुप देखील आपसूक येते. खरं तर, त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं तयार झालं की संवाद हा सुंदर पध्दतीने रंगतो. अनेक गोष्टींचे शेअरिंग वाढते, सर्व काही बोलून टाकल्यामुळे मनात काही राहत नाही आणि विशेष म्हणजे आयुष्यात जबाबदारीने कसं वागावं याचे धडे प्रत्येक पाल्याला त्याच्या पालकांकडूनच मिळत असतात. नात्याने वडील आणि मुलगा, पण एकमेकांशी बाँडिंग अगदी मित्रासारखी...अशीच एक जोडी सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे.

मनापासून प्रेम केले जाते त्याला आशिकी असे म्हणतात. पण वेड्यासारखं प्रेम हे केवळ प्रेयसी अथवा प्रियकरावरच केले जाते असे नाही. आपल्या पालकांवरही आपण निस्वार्थीपणाने प्रेम करतो. ‘अशी ही आशिकी’ हा सिनेमा फक्त कपल नाही तर संपूर्ण फॅमिली एन्जॉय करु शकते अशी कथा या सिनेमाची आहे. यामध्ये अभिनेते सुनिल बर्वे आणि अभिनय बेर्डे यांनी वडील-मुलाची भूमिका साकारली आहे. प्रत्येक वडील हे कष्ट करुन आपल्या मुलाला लहानाचे मोठे करतात. भविष्यात त्याला कशाचीही कमी पडू नये याचा विचार ते करतात. मुलाला काय हवं नको हे वडीलांसाठी पहिले प्राधान्य असते, त्यानंतर स्वत:चा विचार केला जातो किंवा केला ही जात नाही. असेच स्वयमचे (अभिनय बेर्डे) वडील आहेत. पण आपल्या वडीलांनी आपल्या हवं ते पुरवण्यासाठी स्वत:ची इच्छा पूर्ण केली नाही, त्यांना जे हवं ते त्यांनी घेतले नाही असे स्वयमच्या लक्षात आल्यावर स्वयमने त्यांच्यासाठी त्यांना हवी ती गोष्ट विकत घेऊन दिली. नकळतपणे आपली आवडती वस्तू मुलाने जाणली आणि ती सरप्राईज भेट दिली यापेक्षा दुसरा आनंद वडीलांसाठी कोणताच नसतो.

स्वयमच्या वडीलांना सॅक्सोफोन हवा असतो. त्यांना त्याची आवड असते. पण कधी घेता येऊ शकल्यामुळे स्वयम त्यांना सॅक्सोफोन सरप्राईज गिफ्ट म्हणून देतो. वडीलांची इच्छा पूर्ण करून त्यांना सॅक्सोफोन विकत घेऊन देण्यासाठी स्वयम त्याची गिटार विकतो. यावरुन पुन्हा नात्याचे महत्त्व अधोरेखित होते की, आपल्या वडीलांच्या किंवा मुलांच्या खुशीपुढे दुसरे काहीच महत्त्वाचे नसते. स्वयम आणि अमरजा यांच्या लव्हस्टोरीबरोबर, एका हळव्या नात्याची गोष्ट अनुभवण्यासाठी १ मार्चला नक्की पाहा ‘अशी ही आशिकी’. हेमलला भेटण्या अगोदर अभिनयचे झाले होते तीन ब्रेकअप्स ‘पहिलं प्रेम...पहिली आठवण’ यामध्ये रमणारी यंग पिढी आता अपग्रेड झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता ‘पहिल्या प्रेमाच्या भावनेला’ टफ कॉम्पिटेनश देण्यासाठी हल्ली ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ही फार रुळलंय. कोणाला पहिल्या भेटीतच प्रेम होतं तर कोणाच्या आयुष्यात नव्याने प्रेम करण्यासाठी अनेक मुली येत असतात. शेवटी, काय तर...प्रेम हे प्रेम असतं, प्रत्येकासाठी ते जरा वेगळं असतं. प्रेमात जितका सुकून आहे तितकंच प्रेम निघून गेल्यावर त्यात दर्दही आहे. असंच काहीसं झालंय आपल्या हिरोच्या बाबतीत.

‘अशी ही आशिकी’मधील कपल स्वयम (अभिनय बेर्डे) आणि अमरजा (हेमल इंगळे) यांच्या रोमँटिक लव्हस्टोरीची झलक सर्वांनी टिझर, ट्रेलर आणि गाण्यांतून पाहिली आहे. गाण्यातून टप्याटप्याने फुलणारी त्यांची लव्हस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत, हे सोशल मिडीयावर मिळणा-या प्रतिक्रियेतून दिसून आले आहे. कदाचित, प्रेक्षकांना वाटत असेल की अमरजा हे स्वयमचा ‘पहला पहला प्यार है...’ पण असं काहीच नाही. अमरजा स्वयमच्या आयुष्यात येण्यापूर्वी स्वयमच्या तीन गर्लफ्रेण्ड्स होत्या. पण दुर्देवाने, त्या तिघींशीही त्याचं ब्रेक अप झालं होतं.

तीन ब्रेकअप्स झाल्यावर आता स्वयमच्या मनात ‘मोना’ नावाची एक मुलगी घुटमळतेय. ब्रेकअप्सनंतरचं स्वयमचं लेटेस्ट क्रश मोना असते. पण मोनाला प्रपोज करायचंच या पूर्ण तयारीत असलेल्या स्वयमच्या आयुष्यात अमरजा कशी आली, त्या तीन गर्लफ्रेण्डशी संबंधित अमरजा स्वयमकडे कधी काही विचारपूस करणार का, स्वयम त्याची उत्तरे कशी देणार आणि त्यानंतर या दोघांची आशिकी कशी फुलणार हे पाहण्यासाठी १ मार्चला नक्की पाहा ‘अशी ही आशिकी’ तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येतेय. त्यामुळे या जोडी प्रेक्षकांकडून मिळणारा रिसपॉन्स त्यांच्यासाठी देखील नक्कीच खास असेल.

गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’ सिनेमाचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या सिनेमाचे निर्माते आहेत. 

टॅग्स :अभिनय बेर्डेसुनील बर्वे