आमीर सोबत झळकलेली रिना आता का करतेय बोभाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:42 IST
आमीर खान सोबत काम करण्याची इच्छा तर सगळ््यांनाच असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अजिंठा चित्रपटातून फिल्म करिअरची सुरुवात करणारी ...
आमीर सोबत झळकलेली रिना आता का करतेय बोभाटा
आमीर खान सोबत काम करण्याची इच्छा तर सगळ््यांनाच असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अजिंठा चित्रपटातून फिल्म करिअरची सुरुवात करणारी रिना अग्रवाल. रिनाने बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनीसल्ट सोबत तलाश या चित्रपटात काम केले आहे. पण आता रिना बोभाटा करतेय. अहो, बोभाटा करतेय म्हणजे गैरसमज करु घेऊ नका रिना झाला बोभाटा नावाचा एक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच दिसणार आहे. रिना नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. वास्ताविक जीवनातले राहणीमान आणि विचारसरणींपेक्षा अतिशय वेगळे रोल तिने स्वीकारले आहेत. कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी आपल्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टींमध्ये बदल कराण्याची गरज असते. भूमिकेसाठी लागणारी भाषा, राहणीमान, पेहराव या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आणि रिनाने नेहमीच तिच्या भूमिकांना ह्या सगळ्या गोष्टींद्वारे शंभर टक्के न्याय दिला आहे.रिनाने मराठीसोबतच हिंदीतही आपली ओळख निर्माण केली. तलाश या हिंदी सिनेमात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर हिंदी मालिका एजंट राघव मध्येही ती झळकली. पण नुकत्याच आलेल्या कलर्स मराठी वरील एका जाहिरातीतला तिचा टॅक्सी ड्राइव्हरचा लूक सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा होता. रिना मात्र आता आपला मॉडर्न अंदाज बाजूला ठेऊन झाला बोभाटा या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सावळा रंगवर्ण आणि अतिशय साधे राहणीमान असलेल्या एका खेडेगावातल्या मुलीची भूमिका ती ह्या सिनेमात साकारताना दिसणार आहे. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम, मयुरेश पेम यांच्यासोबत ती मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता 'झाला बोभाटा' तला हा तिचा गावराण लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतोय हे लवकरच कळेल.