अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कपल आहेत. ते दोघे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असून चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच ते दोघे युरोप टूरवर गेले होते. तिथले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरेतर या कपलच्या घरी एक छोटा सदस्य दाखल झाला आहे. त्याची ओळख त्यांनी चाहत्यांना करून दिली आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या घरी नवीन मेंबर आल्याचे सांगितले आहे. त्यांनी कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे. ज्याचं नाव ठेवलंय पिकू. याआधी देखील त्यांच्याकडे डॉग आहे, जिचं नाव डोरा आहे. त्यांनी संपूर्ण कुटुंबाचा आनंदी फोटो आणि पिकूचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून त्यांनी लिहिले की, पीकूला भेटा. कुटुंबातील नवीन सदस्य. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही नवीन सदस्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंटसिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या फसक्लास दाभाडे या सिनेमात झळकले होते. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ-मिताली सह अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.