Join us  

५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 7:08 PM

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या.

ठळक मुद्देअंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, डॉ. काशिनाथघाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार आणि बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके नुकतीच घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, डॉ. काशिनाथघाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

पुरस्कारात यांनी मारली बाजीउत्कृष्ट कला दिग्दर्शनकै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हनरेंद्र हळदणकरबंदीशाळा

उत्कृष्ट छायालेखनकै. पांडूरंग नाईक पारितोषिक रु. 50 हजार आणि मानचिन्हसुधीर पळसानेआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट संकलनरु. 50 हजार आणि मानचिन्हनचिकेत वाईकरतेंडल्या

उत्कृष्ट ध्वनीमुद्रणरु. 50 हजार आणि मानचिन्हगंधार मोकाशीआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट ध्वनी संयोजनरु. 50 हजार आणि मानचिन्हमंदार कमलापूरकरपुष्पक विमान

उत्कृष्ट वेशभूषारु. 50 हजार आणि मानचिन्हचैत्राली गुप्तेएक सांगायचंय-अनसेड हार्मोनी

उत्कृष्ट रंगभूषारु. 50 हजार आणि मानचिन्हविक्रम गायकवाडआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट बालकलाकारकै. गजानन जहागिरदार पुरस्कार रु. 50 हजार आणि मानचिन्हश्रीनिवास पोकळेनाळआणि अमन कांबळेतेंडल्या या चित्रपटांना मिळाले नामांकनंसर्वोत्कृष्ट कथाकै.मधुसूदन कालेलकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हशिवाजी लोटन पाटीलभोंगा

सुधाकर रेड्डी यंकट्टीनाळ

अरुणा राजेफायरब्रँड

उत्कृष्ट पटकथापारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हसुमित्रा भावेदिठी

शिवाजी लोटन पाटीलनिशांत धापसेभोंगा

अभिजीत शिरीष देशपांडेआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कृष्ट संवादकै.आचार्य अत्रे पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हविवेक बेळेआपला माणूस

अभिजित शिरीष देशपांडेगुरु ठाकूरआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

अरुणा राजेफायरब्रँड

उत्कृष्ट गीतेकै.माडगुळकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हसंजय कृष्णाजी पाटीलगीत-काळोखाच्या वाटेवर उजेड रुसला बाईबंदीशाळा

सुनील सुखटणकरगीत-राधे राधेवेलकम होम

सायली खरेगीत- दिस येती दिस जातीन्यूड

उत्कृष्ट संगीतकै.अरुण पौडवाल पारितोषिक 50 हजार आणि मानचिन्हराजेश सरकाटेमेनका उर्वशी

शैलेंद्र बर्वेएक सांगायचय अनसेड हार्मोनी

नरेंद्र भिडेसंतोष मुळेकरपुष्पक विमान

उत्कृष्ट पार्श्वसंगीतरु.50 हजार आणि मानचिन्हसंतोष मुळेकरआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

विजय नारायण गवंडेबंदीशाळा

पियूष कनोजियासविता दामोदर परांजपे

उत्कृष्ट पार्श्वगायकरु.50 हजार आणि मानचिन्हआदर्श शिंदेगीत - या जगी नसेन मीसोपस्कार

हृषिकेश रानडेगीत- तुझ्या आठवणीचेव्हॉटस अप लग्न

स्वप्निल बांदोडकरगीत-मला सॉरी म्हणायचंयमाधुरी

उत्कृष्ट पार्श्वगायिकारु.50 हजार आणि मानचिन्हनिहीरा जोशी देशपांडेगीत-फुंकरीची वादळेव्हॉटस अप लग्न

प्रियांका बर्वेगीत-दीशा पेटल्या दाहीबंदीशाळा

वैशाली सामंतगीत-तुम्ही येताना केला इशाराफर्जंद

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकरु.50 हजार आणि मानचिन्हदिपाली विचारेपुष्पक विमान

उमेश जाधवमेनका उर्वशी

फलवा खामकर    व्हॉटस अप लग्न

उत्कृष्ट  अभिनेताकै.शाहू मोडक पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हश्री शिवाजी गणेशन पुरस्कारके.के.मेमनएक सांगायचय अनसेड हार्मोनी

किशोर कदमदिठी

सुबोध भावेआणि डॉ. काशिनाथ घाणेकर

उत्कष्ट अभिनेत्रीकै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हमुक्ता बर्वेबंदीशाळा

देविका दप्तरदारनाळ

कल्याणी मुळेन्यूड

सहाय्यक अभिनेताकै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हसुमित राघवनआपला माणूस

स्वानंद किरकिरेचुंबक

सचिन खेडेकरफायरब्रँड

सहाय्यक अभिनेत्रीकै.शांता हुबळीकर आणि कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50हजार आणि मानचिन्हराजेश्वरी सचदेवफायरब्रँड

नंदीता धुरीआणि डॉ.काशिनाथ घाणेकर

छाया कदमन्यूड

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेताकै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक रु.50 हजार आणि मानचिन्हआशिष गिरमेभूर्जी

फिरोज शेख

टॅग्स :आणि डॉ. काशिनाथ घाणेकरनाळ