पाच रुपये मिळाले की सई का होते खूष ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 16:00 IST
सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार म्हणजे त्यांचे मानधन हे लाखो - करोडो रुपयांमध्येच असणार यात काही शंका नाही. कलाकार अगदी ...
पाच रुपये मिळाले की सई का होते खूष ?
सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार म्हणजे त्यांचे मानधन हे लाखो - करोडो रुपयांमध्येच असणार यात काही शंका नाही. कलाकार अगदी पाच दहा मिनिटांच्या कार्यक्रम उपस्थितीसाठी देखील लाखो रुपये घेताना आपण पाहतो. परंतू जर या कलाकारांना कमी पैसे मिळाले म्हणुन ते आनंदित झाले असे जर आपल्याला सांगितले तर नवल वाटेल ना. पण हो तसेच झाले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरला पाच रुपये मिळाले तरी ती सध्या एकदम खुश होते. बरं हे आम्ही सांगत नाही तर या गोष्टीचा खुलासा स्वत: सईने केला आहे. अहो सध्या सगळीकडेच नोटाबंदीचा त्रास सर्वांनाच होताना दिसतोय. अशात जर कोणाला शंभर रुपये मिळाले तर नक्कीच आनंद हातो. परंतू सईला मात्र पाच रुपये मिळाले तरी खुप भारी वाटते. नोटाबंदी विषयी बोलताना सईने ही गोष्ट सांगितली आहे. सई सांगते, नोटाबंदी झाल्यामुळे आता खºया अर्थाने पैशाची किंमत मला समजू लागली आहे. या सर्व गोष्टी सुरळीत व्हायला दोन तीन महिने लागतील. पण या निमित्ताने तरी सर्वांना एक वेगळी लाईफस्टाईल जगण्याची संधी मिळाली आहे. आणि आपण कमी पैशात देखील राहू शकतो हे सुदधा समजलले आहे. काटकसरीत राहण्याची यामुळे सर्वाना सवय होतेय. त्यामुळे मला तरी अशाप्रकारची जीवनशैली जगायला नक्कीच आवडेल. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी करोडो रुपये घेणारे कलाकार देखील आता काटकसरीने जगत आहेत. पैसे काढण्यासाठी बँका आणि एटीएमच्या रागांमध्ये उभे राहत आहेत. त्यामुळे आता या नोटांबंदीमुळे सितारे जमिनीवर आले असे म्हणायला काहीच हरकत नाही.1:50 PM 12/10/2016