१२३४ होणार आॅगस्टमध्ये प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 12:52 IST
सैराट यश पाहता अनेक मराठी चित्रपटांनी आपल्या ठरलेल्या प्रदर्शित तारखा पुढे ढकलल्या होत्या. यामध्ये १२३४ या चित्रपटाचा देखील समावेश ...
१२३४ होणार आॅगस्टमध्ये प्रदर्शित
सैराट यश पाहता अनेक मराठी चित्रपटांनी आपल्या ठरलेल्या प्रदर्शित तारखा पुढे ढकलल्या होत्या. यामध्ये १२३४ या चित्रपटाचा देखील समावेश होता. हा चित्रपट मे व जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. पण मे मध्ये सैराटची धूम व जूनमध्ये देखील अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे अखेर या चित्रपटाची प्रदर्शित तारीख ५ आॅगस्ट ठरविण्यात आली. मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित '१२३४' हा चित्रपट आहे. यामध्ये भूषण प्रधान,संजय नार्वेकर, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, गणेश यादव, विजय कदम, अरुण कदम, विजय मौर्या, जयवंत वाडकर, अनिकेत केळकर, विशाखा सुभेदार, प्रिया मराठे, तेजा देवकर, संजय मोने, अभिजीत चव्हाण, किशोर चौघुले, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, गुरु आनंद आणि प्रणव रावरा या कलाकारांचा या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. सस्पेन्सवर आधारित या चित्रपटाची कहानी आहे.