Join us

"इंडस्ट्रीमध्ये कौतुक करण्याचा तुटवडा...", मराठी अभिनेत्याचं रोखठोक मत; म्हणाला- "कोणाच्या भाग्यातलं काम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:55 IST

अभिनेते अशोक समर्थ हे मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे.

Ashok Samarth: अभिनेते अशोक समर्थ (Ashok Samarth) हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे. वेगवेगळ्या मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक समर्थ यांनी अभिनय क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

अशोक समर्थ यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीतील कटू सत्य सांगितलं आहे. दरम्यान, या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत मी बोलतो की, कौतुक नावाची जी एक प्रक्रिया असते याचा फार याचा तुटवडा आहे. खरं तर कोणीच कोणाच्या भाग्यातलं काम किंवा कोणीच कोणाला  रिप्लेसमेंट नसते. मी अशा अर्थाने म्हणतो की, तुमचं मी काही हिरावून घेऊ शकत नाही. शिवाय माझंही तुम्ही काही हिरावून घेऊ शकत नाही. पण, ज्याचा आपल्यावरती प्रभाव पडतो त्या गोष्टींचं कौतुक करणं याचा आपल्याकडे तुटवडा आहे."

त्यानंतर अभिनेते म्हणाले, "फक्त मला भीती एका गोष्टीची वाटत जायची की मधल्या एका टप्प्यापर्यंत की दुनियेतल्या कोणत्याही क्षेत्रातल्या माणसांनी इतक्या थराला जाऊन लोकांबरोबर वागू नये की, एखाद्या माणसाने स्वतःला संपवण्याचा विचार त्याच्या मनामध्ये यावा. कारण, सगळेच अशोक समर्थ नाहीयेत किंवा नसतील किंवा तितक्या परिश्रमामधून ते एक तुमचं मन तसं कटू तयार होतं. एका लेव्हलला पण बऱ्याचदा  दुर्दैवाने आत्ताच्या पिढ्यांना ते सकस अन्न मिळत नाहीये. ज्याच्यामुळे त्यांच्या मेंदूची किंवा त्यांच्या सहनशीलतेची तेवढ्या ताकदवर पद्धतीने वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे आज किती आत्महत्यांचं प्रमाण वाढलेल आहे आणि नुसतं शेतकऱ्यांचंच नाही विविध क्षेत्रामध्ये हे असं घडतंय." असं म्हणत अशोक समर्थ यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. 

वर्कफ्रंट

अशोक समर्थ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 'सिंघम', 'रावरंभा' तसेच 'बलोच' आणि 'सत्या-२' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय रंगभूमीवरही त्यांचा दांडगा वावर आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी