Join us  

रेशम ही माझ्या घरातील एक सदस्य - राजेश शृंगारपुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 3:51 PM

काही वादग्रस्त सीन्समुळे प्रेक्षकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. दोघांच्या नात्याबाबत त्याने नुकतीच एका वृत्तावाहिनीला प्रतिक्रिया दिली. 

मुंबई : वादग्रस्त दृश्यांनंतर अभिनेता राजेश शृंगारपुरे हा मराठी बिग बॉसमधून बाहेर पडला. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या काही वादग्रस्त सीन्समुळे प्रेक्षकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. दोघांच्या नात्याबाबत त्याने नुकतीच एका वृत्तावाहिनीला प्रतिक्रिया दिली. 

रेशमसोबतच्या नात्याबाबत तो म्हणाला की, ' माझं आणि रेशमचं नातं जसं बिग बॉसच्या घरात होतं तसंच राहणार आहे. एक मैत्रिण म्हणून ती माझ्या परीवारातील एक सदस्य राहणार आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. लोकांना ते वेगळं काहीतरी वाटलं. आमचं बॉंडिंग चांगलं जमलं होतं. केवळ आम्ही खूप जास्त एक्प्रेस झालो असं मला वाटतं आणि हेच लोकांना खटकलं'. 

'ज्या गोष्टीवरुन वाद झाला त्यात माझ्या पत्नीला, मुलांना, मित्रांना काहीच वाईट वाटलं नाही. रेशम आणि माझ्यात एक चांगलं बॉंडिंग होतं. आमच्या वागण्यात व्हल्गॅरीटी नव्हती. फक्त आम्ही एक्स्प्रेस झालो इतकंच. ज्या व्यक्तीसोबत माझं चांगलं बॉंडिंग आहे त्या व्यक्तीकडे मी एक्स्प्रेस होत असेल तर त्यात वाईट काय आहे?

रेशमला नॉमिनेट केलं असतं का? असा प्रश्न विचारल्यावर त्याने लगेच होकार दिला. त्याने सांगितलं की, बिग बॉस हा एक खेळ आहे. आम्ही दोघेच शेवटपर्यंत राहिलो असतो तर मी तिला नॉमिनेट केलं असतं, असं तो म्हणाला. 

टॅग्स :बिग बॉस मराठीराजेश श्रृंगारपुरे