Join us  

परदेशात व्हॅकेशनसाठी गेलेली उर्मिला थंडीने कुडकुडली; व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "सकाळी ६.३० वाजता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 3:20 PM

उर्मिला सध्या व्हॅकेशन ट्रीपवर आहे. उर्मिला परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. उर्मिला जॉर्जियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत तिने साकारलेली वैद्येहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. उर्मिला सध्या व्हॅकेशन ट्रीपवर आहे. उर्मिला परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. उर्मिला जॉर्जियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी उर्मिला सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबतही अपडेट देत असते. आताही जॉर्जियावरुन उर्मिलाने व्हिडिओ शेअर केला आहे. जॉर्जियामध्ये असलेल्या प्रचंड थंडीमध्ये उर्मिलाला बोलण्यासही त्रास होत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कडाक्याची थंडीतही उर्मिलाने जॉर्जिायामध्ये मॉर्निंग वॉक केल्याचं दिसत आहे. थर्मल कपडे घालून कानांना तिने इयर मफ लावल्याचं दिसत आहे. 

"सॅन फ्रॅन्सिस्कोमधून आपण आता जॉर्जियामध्ये पोहोचलेले आहोत. इथे भयंकर थंडी आहे. रात्रभर झोप लागलेली नाही. सकाळी ६.३० वाजता मी मॉर्निंग वॉकला आले आहे," असं उर्मिला व्हिडिओत म्हणत आहे. "हा मॉर्निंग वॉक मी कधीच विसरू शकत नाही", असं कॅप्शन उर्मिलाने या व्हिडिओला दिलं आहे. 

उर्मिला ही महेश कोठारेंची सून आहे. महेश कोठारेंचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारेबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना जिझा ही मुलगी आहे. अनेकदा उर्मिला लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेसेलिब्रिटी