Join us

मराठी अभिनेत्रीही होऊ लागल्या बोल्ड

By admin | Updated: July 24, 2015 02:50 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘किसिंग सीन’चे फार अप्रूप नाही. इमरान हश्मीसारखा कलाकार तर त्यावरच जणू जगतोय. पण मराठी चित्रपटसृष्टीत थोडंसं

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘किसिंग सीन’चे फार अप्रूप नाही. इमरान हश्मीसारखा कलाकार तर त्यावरच जणू जगतोय. पण मराठी चित्रपटसृष्टीत थोडंसं सोवळं पाळलं जातं. ‘लव्ह सीन’ दाखवायचा असेल तर फुले, पक्षी यांचाच वापर व्हायचा. विवाहित नायक-नायिकाही एक हाताचे अंतर ठेवतात. ‘जोगवा’मध्ये उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांचा किसिंग सीन गाजला, पण त्याचे कारण वेगळे होते. उपेंद्रला जोगवा होण्यासाठंी साडी घालावी लागली असताना तो मुक्ताला किस करतो. तर ऊर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनी ‘दुभंग’मध्ये किसिंग सीन दिला. मानसी नाईकने ‘जबरदस्त’ चित्रपटात पुष्कर जोगसोबत किसिंग सीन केला. पण कथेची गरज असल्याने आपण हा सीन केल्याचे ती म्हणते. याच प्रकारे कथेची गरज म्हणून सायबर क्राइम या ज्वलंत विषयावरील ‘शॉर्टकट’ सिनेमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे किसिंग सीनमध्ये दिसणार आहे. मात्र, बोल्ड अंदाजात नाही, तर हा एक इंटिमेट सीन असल्याचे म्हटले जाते. संस्कृती म्हणाली, हा इंटिमेट सीन अभिनेता वैभव तत्त्ववादीसोबत झाल्याने मी बऱ्याच प्रमाणात कम्फर्टेबल होते. चार-पाच वर्षांपासून वैभव माझा एक चांगला मित्र असल्याने मी काही प्रमाणात कम्फर्टेबल होते.