Join us  

Video: प्रवीण तरडेंच्या मांजरीला लागलं मोबाईलचं व्यसन; पाहिली संपूर्ण वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:00 PM

Snehal tarade: प्रवीण तरडे यांची मांजर चांगलीच फिल्मी असून तिचा हा मजेशीर व्हिडीओ स्नेहल तरडे यांनी शेअर केला आहे.

मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (pravin tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. प्रवीण यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी स्नेहल तरडेदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्नेहल कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे कायम त्या नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

स्नेहल तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची पाळीव मांजर दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही मांजर चक्क मोबाईलवर वेबसीरिज पाहात आहे. इतकंच नाही तर तिने बसल्या जागी सगळी वेबसीरिज पाहिली त्यामुळेच तिचा हा मजेशीर व्हिडीओ स्नेहल यांनी शेअर केला.

"आता हेच बघायचं राहिलं होतं रे देवा!!! माणसं तर केव्हाच वेडी झालीएत, आता प्राण्यांना पण वेड लावेल हा मोबाईल. पूर्ण एपिसोड पाहिलाय माझ्या मांजरीने.. पूर्ण!," असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

दरम्यान, स्नेहल तरडे सोशल मीडियावर सक्रीय असून त्या त्यांच्या फिल्मी करिअरसोबत पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात बऱ्याचदा त्या त्यांच्या मांजरीचेही काही मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

टॅग्स :प्रवीण तरडेमराठी अभिनेतासेलिब्रिटीवेबसीरिज