Join us  

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 12:22 PM

Shruti marathe : श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे.

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच सध्या बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. त्यामुळे सगळेच जण मोठ्या उत्साहात बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. अगदी गणरायाची मुर्ती निवडण्यापासून ते डेकोरेशनपर्यंत सारं काही मोठ्या थाटात करण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरु आहे. यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील? मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन होतं. तर, काही जण ढोलताशा पथकात सहभागी होऊन बाप्पाची जंगी मिरवणूक काढतात. यामध्येच अभिनेत्री श्रुती मराठे (shruti marathe) हिची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्रुतीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ढोल-ताशा वाजवण्याची प्रॅक्टीस करताना दिसत आहे.  श्रुती उत्तम वादक असून ती दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल-ताशा वाजवते. त्यामुळे २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा श्रुती वादनाकडे वळली आहे. 

दरम्यान, श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रुती ढोलताशा पथकातील वादक आहे.

टॅग्स :श्रुती मराठेसेलिब्रिटीसिनेमागणेशोत्सव विधी