Join us  

'जे मोजके सिनेमे केले त्यातला विनाकारण राजकारण..'; 'या' कारणामुळे रुपाली करत नाही सिनेमात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 10:52 AM

Rupali bhosale: रुपालीने एक पोस्ट शेअर करत सिनेमाविषयीचं तिचं मत व्यक्त केलं आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकार नवारुपाला आले आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.  या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे रुपालीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर झळकणारी रुपाली रुपेरी पडद्यावर म्हणजेच सिनेमात कधी झळकणार हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं रुपालीने अलिकडेच उत्तर दिलं आहे.सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुपालीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या करिअरविषयी भाष्य केलं आहे. सोबतच ती कोणत्याही सिनेमात का काम करत नाही यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

काय आहे रुपालीची पोस्ट?

Larger than life सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान comfortable seat , air-conditioning, आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं, तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही, कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो, आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले. पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा "विनाकारण राजकारण" हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे, असं रुपाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते, तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे. कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं ....""विनाकारण राजकारण" च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते..."

टॅग्स :रुपाली भोसलेटेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिकासिनेमा