Join us  

बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 4:05 PM

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.  कलर्स मराठी वाहिनीवर दाखल झालेली नवीन मालिका बायको अशी हव्वीमध्ये राखीच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. सध्या या मालिकेतील एका रोमँटिक सीनची चर्चा होताना दिसते आहे.

मीरा जोशी सध्या बायको अशी हव्वी मालिकेत राखीच्या भूमिका साकारते आहे. या मालिकेतील राखी आणि विकास पाटीलने साकारलेल्या विभासच्या रोमँटिक सीनची सध्या चर्चा होताना दिसते आहे. पण हा सीन पाहिल्यानंतर अनेकांना अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या ए दिल है मुश्किल या सिनेमातील बोल्ड सीनची आठवण होते. ऐ दिल है मुश्किल चित्रपटात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत बरेच बोल्ड सीन दिले आहेत. तिचे हे सीन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसाच काहीसा सीन या मालिकेतही दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मीराच्या या सीनची सगळीकडेच हवा पाहायला मिळते आहे.

राखीच्या भूमिकेबद्दल मीरा म्हणाली की, राखीची भूमिका खूप फन लव्हिंग आहे. ती अपंग असल्याचे तिला अजिबात दुःख वाटत नाही. ती खूप स्वच्छंदी आणि पॉझिटिव्ह आहे. 

मीरा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिची इंदौरी इश्क आणि ऑरेंज लिली ही वेबसीरिज लवकरच भेटीला येणार आहे. तसेच तिने वृत्ती चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपटही रिलीजच्या वाटेवर आहे. याशिवाय तिची काही गाणीही प्रदर्शित होणार आहेत.

टॅग्स :मीरा जोशीऐश्वर्या राय बच्चनरणबीर कपूर