Join us  

'माझी अवस्था 'जब वी मेट'मधल्या करीनासारखी'; ब्रेकअपच्या दु:खावर मानसी नाईक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:12 PM

Manasi naik:अलिकडेच मानसीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (manasi naik) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच मानसीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला कशी सावरते हे सांगितलं आहे. 

“तू कधी हार्ट ब्रेक केलेत का?” असा प्रश्न मानसीला विचारण्यात आला. त्यावर नाही. हे लोकांना खोटं वाटेल. पण, मी कधीच कोणाचं हार्ट ब्रेक केलं नाहीये. उलट माझंच हार्ट खूपदा ब्रेक झालंय. पण ठीक आहे. मी लवकर यातून बाहेर पडले. माझं असं असतं की, यात काही रॉकेट सायन्स नाहीये. मात्र, मी खूप भावनिक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे सुरुवातीला मी खूप रडते, चिडचिड करते. मात्र, त्यानंतर माझं हे सगळं बंद होतं. मी सतत रडत बसत नाही. एकदाच काय ते रडून घेते आणि मग माझ्याच बरोबर असं का? मी किती वेडी आहे, असं म्हणते. जब वी मेटमधल्या करीनासारखा तो सीन माझ्यासोबत होतो. त्यानंतर मी पुन्हा नव्या उभी राहते आणि आताही मी नव्यानेच उभी राहिली आहे, असं मानसी म्हणाली.

दरम्यान, मानसीने महेश कोठारे यांच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर वाट माझी बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या गाण्यांमुळे ती प्रचंड चर्चेत आली. मानसी लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही झळकणार आहे.

टॅग्स :मानसी नाईकटेलिव्हिजनसिनेमा