Join us  

30 वर्ष भाड्याच्या घरात रहात होती हृता दुर्गुळे; अखेर घेतलं स्वत:चं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 11:15 AM

Hruta durgule: हृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिच्या घराविषयी भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). मन उडू उडू झालं, फुलपाखरु अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली हृता लवकरच कन्नी या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात हृतासोबत अभिनेता अजिंक्य राऊत स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे सध्या तिच्या या सिनेमाची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्येच हृताने तिच्या घराची गोष्ट सांगितली आहे. अलिकडेच हृताने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या घराविषयी भाष्य केलं आहे.

"स्वत:चं घर असणं ही खूप छान गोष्ट आहे. या भावना शब्दांत व्यक्तच करता येणार नाहीत. पण छान वाटतंय ती कुठेतरी आपलं हक्काचं घर आहे. मी कधीच स्वत:च्या घरी राहिले नाहीये गेली ३० वर्ष. मी ११ घरं बदलली आहेत. माझ्या आई-बाबांसोबत भाड्याच्या घरात वगैरे राहिली आहे. मला सतत असं वाटायचं की, मला काय फार मोठं भारी घर नकोय. पण, मला असं एक घर हवं होतं जिथे माझं लग्न झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांना तिथून कोणी काढून टाकणार नाही. माझ्या भावाला कोणी काढणार नाही. एक सिक्युरिटी हवी होती", असं हृता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आपल्या पाठीमागे कोणी तरी असलं की एक अशी फिलिंग असते ना सिक्यिरिटीची. पण, जेव्हा तुमच्या मागे कोणीही नाहीये हे तुम्हाला माहित असतं त्यावेळी तुमच्या आवडीनिवडी फार वेगळ्या असतात. त्यामुळे मला माझ्या भावासाठी त्याच्या पाठीमागे उभं रहायचं होतं. देवाच्या कृपेने मला कोणत्याच कामाच्या बाबती कॉम्प्रोमाइज करावं लागलं नाही. सिनेमा असो मालिका असो. आतापर्यंत असं झालं नाहीये की मी काम करुन ६ महिने बसून आहे. त्यामुळे मी माझ्या भावाला कायम सांगते की, आता काहीच विचार करायची गरज नाही. मी आता ते सगळं अनुभवतीये की तुमच्यावर जबाबदारी नसताना काय वाटतं. याच कारणामुळे काहीही करुन मला घर घ्यायचं असं माझं ठरलं होतं. आणि. फायनली माझं हक्काचं घर झालंय."

दरम्यान,अनेकांची क्रश असलेल्या हृताने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनन्या हा तिचा सिनेमा विशेष गाजला. हृताने प्रतिक शाह याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीसिनेमाटिव्ही कलाकार