मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. (amruta khanvilkar) अमृताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अमृताचं नृत्याविष्कार असलेलं 'वंदन हो' हे 'संगीत मानापमान'मधील गाणं सध्या चर्चेत आहे. अमृताने गेल्या वर्षी २०२४ मध्ये दिवाळीत नवीन घर घेतलंय. अमृताने नुकतंच नवीन घरात केलेल्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सर्वांना दाखवला. या व्हिडीओत अमृताने नवीन घराचं नाव काय ठेवलंय, याचाही खुलासा केलाय.
अमृताच्या नवीन घराचं नाव आहे खूप खास
अमृताने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं "नव्या वर्षाची ….नवी सुरुवात.. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला.. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं “एकम”.. “एकम” म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं – उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ." असं खास कॅप्शन दिलंय. अशाप्रकारे अमृताच्या नवीन घराचं नाव आहे 'एकम'. अमृताचं हे नवंकोरं घर मुंबईतील एका टॉवरमध्ये असून २२ व्या मजल्यावर २ बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे. अमृताच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओला लोकांनी पसंती दिलीय.
अमृताचं वर्कफ्रंट
गेल्या वर्षी २०२४ मध्ये लक्ष्मीपूजन आणि स्वतःच्या वाढदिवसाच्या महिन्यात अमृताने नवीन घरात प्रवेश केला. अमृताने गेल्या काही महिन्यांमध्ये 'लाइक आणि सबस्क्राइब', 'धर्मरक्षक छत्रपती संभाजी', 'संगीत मानापमान' अशा काही सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये अमृता हिंदी वेबसीरिजमध्येही झळकत आहे. अमृताच्या नवीन सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.