Join us  

“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 4:06 PM

आदिनाथला अभिनेता नव्हे तर डॉक्टर व्हायचं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथने याबाबत खुलासा केला आहे.

‘छकुला’ चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. लहानपणापासूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेला आदिनाथ आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आदिनाथने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांत काम केलं आहे. पण, आदिनाथला अभिनेता नव्हे तर डॉक्टर व्हायचं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथने याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्य, बालपण आणि कलाविश्वातील करिअर याबाबत त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.

आदिनाथ म्हणाला, “अभिनयातील माझा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला होता. छकुला सिनेमा मी केला. पण, आधी शिक्षण पूर्ण कर, अशी माझ्या आईवडिलांची अट होती. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं. पण, मला सायन्समध्ये जास्त रस होती. मला डॉक्टर व्हायचं होतं. डॉ.आदिनाथ कोठारे...मी मेडिकलची पूर्वपरिक्षा सीईटीही दिली होती. मला चांगले मार्क मिळाले होते. मला बीडीएसमध्ये प्रवेश मिळत होता. पण मला एमबीबीएस करायचं होतं. पण, बीडीएससाठीही २५ लाख रुपये भरुन मला प्रवेश मिळणार होता. पण, मग वडील म्हणाले, आपण कर्ज घेणार, हफ्ते भरणार. आणि मग डॉक्टर होऊनही तू इथेच येणार असशील...तर ती सीट वाया घालवू नको. म्हणून मग मी प्रवेश घेतला नाही.”

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

“सायन्समध्ये रस होता म्हणून मी बायोटेक्नोलॉजीला प्रवेश घेतला. मग मी एमबीए केलं. या सगळ्या दरम्यान मी वडिलांना असिस्टही करत होतो. एमबीए झाल्यानंतर मी नोकरीही केली. तेव्हा मी कांदिवली ते चर्चगेट असा ट्रेनने प्रवास करायचो. त्यानंतर एका कंपनीत मी बिजनेस एनालिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर मग आम्ही कोठारे व्हिजन ही कंपनी सुरू केली,” असंही पुढे आदिनाथ म्हणाला.  

“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

दरम्यान, आदिनाथने ‘झपाटलेला २’, ‘चंद्रमुखी’, ‘निळकंठ मास्तर’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. ‘८३’ या बॉलिवूड सिनेमातही तो झळकला होता. ‘१०० डेज’ या मालिकेतील आदिनाथची भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती.

टॅग्स :आदिनाथ कोठारेमराठी अभिनेतामहेश कोठारेमराठी चित्रपट