Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्मिला टागोर यांच्या आधी या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होते नवाब पतौडी, मग घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:51 IST

शर्मिला टागोर यांच्या आधी मन्सूर अली खान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होते.

'वक्त', 'अनुपमा', 'सफर', 'दाग', 'अमर प्रेम', 'चुपके चुपके', 'नमकीन' अशा सुपरहिट चित्रपटांत काम करुन शर्मिला टागोर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. शर्मिला टागोर यांनी १९६८मध्ये क्रिकेटर मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान यांच्या लव्हस्टोरी कोणत्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. 

पहिल्याच नजरेत मन्सूर अली खान शर्मिला टागोर यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना महागडी फुल पाठवायचे. शर्मिला टागोर यांच्या आधी मन्सूर अली खान बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होते. कधी काळी नवाब मन्सूर अली पतौडी यांच्यासोबत नात्यात होती. मन्सूर अली पतौडी यांच्यासोबत संसार थाटण्याचं स्वप्नं रंगवत होती. शर्मिला टागोर आयुष्यात येण्यापूर्वी सिमी व मन्सूर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. बॉलिवूडपासून क्रिकेट जगतापर्यंत या चर्चा सुरू होत्या. पतौडी व सिमी दोघांनाही पाश्चात्य संस्कृती आवडायची. हीच एक आवड दोघांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तेव्हा क्रिकेटच्या मैदानांपासून पब्लिक इव्हेंटमध्येही दोघेही सतत सोबत दिसायचे.  

असं म्हणतात की, सिमी ग्रेवालबद्दल नवाब पतौडी चांगलेच गंभीर होते. या नात्याला ते एक नाव देऊ इच्छित होते. पण कदाचित नियतीनं वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. शर्मिला टागौरसोबत  नवाब पतौडींची ओळख झाली आणि इथून पुढे सगळंच बदलंल. शर्मिलाला पाहताच, हीच ती आपल्यासाठी बनलेली मुलगी, असं नवाब पतौडी यांना वाटलं आणि तिच्यासाठी त्यांनी सिमीला सोडलं.

शर्मिला मोठी स्टार होती. तर मन्सूर पतौडी बॉलिवूडच्या झगमटापासून बरेच दूर होते. म्हणजेच फिल्मी दुनियेत त्यांना फार रस नव्हता. पण एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून नवाब पतौडी व शर्मिला भेटले आणि पहिल्याच भेटीत पतौडी शर्मिलावर भाळले. इतके की, एकेदिवशी थेट सिमीसोबत ब्रेकअप करण्याच्या विचारात ते तिच्या घरी पोहोचले.  डोअर बेल वाजली, सिमीने दरवाजा उघडला. दरवाज्यात मन्सूर पतौडी उभे होते. त्यांच्या चेह-यावर संकोच होता आणि मनात अनेक प्रश्न. ‘मला माफ कर... पण आपल्यातील सर्व काही आता संपलंय. मला कुणी दुसरी भेटली आहे,’ असं एक श्वासात त्यांनी सिमीला सांगून टाकलं. सिमी क्षणभर गोंधळली. पण तिने स्वत:ला सांभाळलं. मन्सूर पतौडी यांच्यापासून दुरावल्यानंतर सिमीच्या आयुष्यात रवि मोहनची एन्ट्री झाली. दोघांनीही लग्न केलं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. दोघांनी घटस्फोट घेतला. 

टॅग्स :शर्मिला टागोर