Join us

मांजरेकर झाले मेकअपमन

By admin | Updated: June 23, 2015 23:09 IST

चित्रपटसृष्टीत थोडेफार नाव कमावले की त्यांचा मिजाज बदलतो असे बोलले जाते. मात्र काही जुने जाणते कलाकार या सर्वापासून वेगळे असल्याचे दाखवून देतात

चित्रपटसृष्टीत थोडेफार नाव कमावले की त्यांचा मिजाज बदलतो असे बोलले जाते. मात्र काही जुने जाणते कलाकार या सर्वापासून वेगळे असल्याचे दाखवून देतात. दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात स्वत:चा मेकअप स्वत:च केला आहे म्हणे. त्यांचा हा सगळा खटाटोप होता, तो यात ते रंगवत असलेल्या फकिराच्या भूमिकेसाठी.