Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंजिरी फडणीस ‘मराठी’च्या वाटेवर

By admin | Updated: September 10, 2015 04:33 IST

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातील मराठमोळी मंजिरी फडणीस ही अभिनेत्री आठवतेय! महाराष्ट्रीयन असूनही अद्याप मराठी चित्रपटांपासून दूर राहिलेली ही कन्यका

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातील मराठमोळी मंजिरी फडणीस ही अभिनेत्री आठवतेय! महाराष्ट्रीयन असूनही अद्याप मराठी चित्रपटांपासून दूर राहिलेली ही कन्यका आता ‘सर्व मंगल सावधान’मधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. ते पण राष्ट्रीय स्तरावरच्या मालिका, बॉलीवूड चित्रपट आणि ‘आयना का बायना’ या मराठी चित्रपटात झळकलेल्या राकेश वशिष्ठ या अभिनेत्याबरोबर ती पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राहिल खान यांचे असून, अभिषेक जैन हे निर्माते आहेत. चित्रपटाचा टे्रलर नुकताच सोशल नेटवर्किंग साइट्सवर झळकला आहे. ही रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरली आहे.