कर्करोगाशी यशस्वी लढा दिल्यानंतर अभिनेत्री मनीषा कोईराला बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मनीषा आता तंदुरुस्त असून, राजकुमार संतोषीच्या आगामी चित्रपटातून ती रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे,’ असे मनीषाचा मॅनेजर सुब्रतो घोष याने सांगितले. या चित्रपटाची पटकथा मनीषाला आवडली असून, तिने संतोषीला होकार दिल्याचे बोलले जाते. सर्व काही ठरल्याप्रमाणो पार पडल्यास या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू होऊ शकते. मनीषासोबत पंकज कपूरची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. राजकुमार संतोषीच्या 2क्क्1 या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लज्जा’ या चित्रपटात मनीषाने यापूर्वी काम केले होते.