Join us  

Mandira Bedi Video: “नवरा जाऊन…” होळी साजरी केल्यामुळे मंदिरा बेदी ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:16 PM

Mandira Bedi Video: होय, मंदिराने काल मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मंदिराला ट्रोल केलंय....

Mandira Bedi Video: मंदिरा बेदी हे टीव्ही, सिनेमाच्या दुनियेतलं मोठं नाव. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. अनेक चित्रपटांतही ती झळकली. अनेक शो तिने होस्ट केलेत. तूर्तास मात्र मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होतेय. होय, मंदिराने काल धूमधडाक्यात धुळवड साजरी केली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मंदिराला ट्रोल केलंय.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर मंदिराचा होळी खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मंदिरा बेदीला ट्रोल केलं आहे.

“मला वाटतं सहा महिन्यांपूर्वीच हिच्या नवऱ्याचं निधन झालं आणि ही बघा”, अशी कमेंट एकाने केली आहे. काहींनी मिनरल वॉटरने चेहरा धुण्यावरूनही तिला ट्रोल केलं आहे. “नवरा गेला म्हणून काय झालं, अजून पण लोक आहेत”, असंही एकाने म्हटलं आहे. “आज दीदी होळी साजरी करतेय. बिचारीचा नवरा काही महिन्यांआधीच गेला”, अशी कमेंट अन्य एकाने केली आहे. अर्थात काहींनी तिचा बजावही केला आहे.  आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असं म्हणत मंदिराची बाजू घेतली आहे. “मग काय तिने रडत बसायचं, तिलाही आयुष्य जगण्याचा अधिकार आहे,” असं एका युजरने म्हटलं आहे.

मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज कौशलने 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. मंदिराने 1999 मध्ये राज कौशलशी लग्न केले होतं. दोघांनी लग्नासाठी १४ फेब्रुवारीचा दिवस निवडला होता. त्यांची पहिली भेट 1996 मध्ये चित्रपट निर्माते मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. राज मुकुलचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना मंदिरा तिथे ऑडिशनसाठी गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मंदिरा आणि राज यांनी तीन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मंदिराच्या कुटुंबाला तो मान्य नव्हते.राजच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं. लग्नाच्या 12 वर्षानंतर दोघेही एका मुलाचे आई-बाबा झाले. यानंतर  २०२० मध्ये दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली, तिचं नाव तारा आहे.  

टॅग्स :मंदिरा बेदीबॉलिवूडहोळी 2023