Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या रुढी बाजूला ठेवून मंदिरा बेदीने स्वतःच केले पती राज कौशलवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:44 IST

राजचे अंत्यसंस्कार मंदिरा बेदीने स्वतः केले. जुन्या रुढी बाजूला ठेवत मंदिराने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला.

ठळक मुद्देमंदिरा आणि राज यांचा प्रेमविवाह होता. त्यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. ते अनेक ठिकाणी एकत्र दिसायचे.

फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) पतीचं निधन झाल्याची बातमी आली आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली. आज पहाटे मंदिराचा पती राज कौशल (Raj Kaushal Death) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज यांच्या निधनानंतर मंदिरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंदिरा आणि राज यांचा प्रेमविवाह होता. त्यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. ते अनेक ठिकाणी एकत्र दिसायचे. 

राजचे अंत्यसंस्कार मंदिरा बेदीने स्वतः केले. जुन्या रुढी बाजूला ठेवत मंदिराने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. या गोष्टीमुळे सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे. पतीला अखेरचा निरोप देताना मंदिरा ढसाढसा रडली. पतीचे पार्थिव रूग्णवाहिकेत ठेवत असताना मंदिराला जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था अनेकांना बघवत नव्हती. मंदिराला रडताना बघून तिचा मित्र रोनित रॉयने तिला सांभाळले. रोनितच्या गळ्यात पडून मंदिरा ओक्साबोक्सी रडत होती.

रविवारी रात्री मंदिरा, राज व मित्रांनी पार्टी केली होती. सोमवारी त्यांनी या पार्टीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. या पार्टीत क्रिकेटर झहीर खान, सागरीका घाटगे, नेहा धुपिया, आंगद बेदी हे ही सामील होते. रविवारीच त्यांच्या घरी झालेल्या पार्टीत ते अगदी आनंदी होते. तर सगळ्यांसोबत चांगला वेळही घालवत होते. पण बुधवारी सकाळी अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

पत्नी अभिनेत्री मंदीरा बेदीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. राज यांच्या जाण्याने मंदीराच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होतं. मंदिरा आणि राज यांना दोन मुलं आहेत. तर एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

टॅग्स :मंदिरा बेदी