बॉलिवूडची ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतने केलेली भविष्यवाणी खरी ठरते, असे कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. होय, मल्लिकाची एक भविष्यवाणी ब-याच अंशी ठरली आहे. 11 वर्षांपूर्वी केलेले तिचे एक ट्विट सध्या तुफान व्हायरल होतेय. याच ट्विटमध्ये तिने एक मोठी भविष्यवाणी केली होती. होय, कमला हॅरीस यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी 2009 साली तिने एक भाकित वर्तवले होते. आज 2020 मध्ये तिने वर्तवलेले हे भाकित काही अंशी खरे ठरले आहे.
अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या त्यांच्या या विजयाने भारतात आनंद व्यक्त केल्या जात आहे. याचदरम्यान मलिक्का शेरावतचे ट्विटही चर्चेत आले आहे.
‘एका धम्माल पार्टीमध्ये एक महिलेसोबत मज्जा करतेय. कमला हॅरीस नावाची ही महिला एकदिवस अमेरिकेच्या राष्ट्रपती बनू शकते, असे म्हटले जातेय,’असे मल्लिकाने या ट्विटमध्ये म्हटले होते. मल्लिकाचे हे ट्विट काही अंशी सत्य ठरले आहे. या ट्विटनंतर 11 वर्षांनंतर खरोखरच कमला हॅरीस अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होत आहेत.
मल्लिका ते मर्डर गर्ल...! वाचा रिमाची ‘हिरोईन’ बनण्याची कहाणी
तुझ्या चित्रपटांमुळेच महिलांवर अत्याचार होतात....! युजरने डिवचले; मल्लिका शेरावतने सुनावले