Join us

गळ्यातील ‘त्या’ पेंडंटवर मलायका अरोराने केला खुलासा, वाचा काय म्हणाली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 15:21 IST

मलायका व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना असा ऊत आला असताना अलीकडे मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले. खुद्द मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता.

ठळक मुद्देअरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहे. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती, मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांच्या नात्याची.   गेल्या काही दिवसांत हे कथित कपल एकमेकांसोबत बिनधास्त फिरताना दिसत आहेत. आता तर मलायका व अर्जुन दोघेही लग्न करणार, असेही बोलले जात आहेत. त्यातच मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरनेच जाहीर केले आहे. मलायका व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना असा ऊत आला असताना अलीकडे मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले. खुद्द मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता. या पेंडंटवर ‘एएम’ असे लिहिलेले असल्याने मलायकाच्या गळ्यातील हे पेंडंट लगेच चर्चेत आले.  या पेंडंटमधील ‘एम’ हे मलायकाच्या नावातील आद्याक्षर असून ‘ए’ हे अर्जुनच्या नावाचे आद्याक्षर असल्याचे म्हटले गेले. केवळ इतकेच नाही तर या पेंडंटद्वारे मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले, असेही मानले गेले. पण थांबा...मलायकाचे मानाल तर असे काहीही नाही. होय, या पेंडंटवर मलायकाने खुलासा केला आहे. मलायकाने केलेल्या खुलाशानुसार, हे पेंडंट प्रत्यक्षात ‘एम ए’ असे आहे. याचा अर्थ ‘मलायका अरोरा’ असा होतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत मिरर इमेज असल्याने ते ‘ए.एम.’ असे दिसले, इतकेच. 

आता मलायकाचा हा खुलासा खरा मानायचा की खोटा, हे तुम्ही ठरवायचे. एक मात्र खरे की, ‘एमए’ असो किंवा ‘एएम’ दोन्ही ‘ए’ आहेच. हेही नसे थोडके. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहे. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत. अलीकडे ‘कॉफी विथ करण 6’ या चॅट शोमध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर, माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली होती.

 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर