Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरा या गाण्याच्या शूटिंगवेळी झाली होती रक्तबंबाळ, सेटवर उडाला होता गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 19:01 IST

अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते.

अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायकानं तिच्या बॉलिवूडमधील कारकीर्दीतील अनुभव एका कार्यक्रमात शेअर केला. त्यावेळी तिनं तिच्या एका आयटम साँगबाबतचा अनुभव सांगितला. 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा चित्रपट दिल सेमधील 'चल छैयां-छैयां' या गाण्यात मलायका थिरकताना दिसली होती. या गाण्याचा अनुभव सांगताना मलायकाने सांगितलं की, डान्स करताना तिला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. ज्यामुळे सेटवर गोंधळ उडाला होता.

या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव मलायकानं नुकत्याच एका डान्स रिएलिटी शोच्या मंचावर शेअर केला. मलायका म्हणाली, या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मी अनेकदा पडले होते. चालती ट्रेन, जोराचा वारा आणि ट्रेनवर उभं असताना मला सतत डाव्या आणि उजव्या बाजूला झुकून संतुलन ठेवायचं होतं. अशात घागरा घालून डान्स करणं माझ्यासाठी खूप कठीण जात होतं. त्यावर उपाय म्हणून माझ्या घागऱ्याला कमरेत दोरी बांधण्यात आली.

मलायका पुढे म्हणाली, ‘अशाप्रकारे दोरी बांधून मी शूट सुरू ठेवलं. पण जेव्हा ती दोरी सोडण्यात आली त्यावेळी त्याच्यामुळे माझ्या कमरेवर त्याच्यामुळे कट आले होते. ज्यामुळे त्यातून रक्तही येऊ लागलं होतं. हे पाहिल्यावर संपूर्ण टीम घाबरली होती. कोणीही काहीही करत होतं. काहीही बडबडत होतं.’

मलायकाची मेहनत कामी आली आणि गुलजार यांनी लिहिलेलं आणि ए. आर. रेहमान यांचं संगीत असलेलं हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्यावेळी ते खूप जास्त लोकप्रिय ठरलं. आजही हे गाणं मलायकाच्या सिने करिअरमधील सर्वात लोकप्रिय गाणं म्हणून ओळखलं जातं. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खाननं केली होती.

तर हे गाणं चालत्या ट्रेनवर शूट करण्याची संकल्पना दिग्दर्शक मणिरत्न यांची होती.

टॅग्स :मलायका अरोराशाहरुख खान